डॉ. शिंदे यांचे जे पोटात तेच ओठात असे बाळासाहेब थोरात बोलले ते शत प्रतिशत खरे आहे असे काँग्रेस नेते संदीपराजे घोरपडे यांनी सांगितले.

परखड स्वभाव पण प्रेम मनात!!
अनेकांचा प्राण वाचविणारा देवदूत जिंकतोय मतदारांची मने.
महाविकास आघाडी तथा भारतीय काँग्रेस चे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना मतदारांची सहानुभूती वाढत असून आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते एकजुटीने कामास लागल्याने सध्या तरी डॉ अनिल शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
डॉ शिंदे हे परखड बोलतात पण त्यांचा स्वभाव हा अत्यंत प्रेमळ आहे. नारळ जसे वरून टणक असते पण आत मधुर पाणी व खोबरे निघते, तसा हा स्पष्ट बोलणारा नेता अमळनेर मतदार संघात जन-मनाचा ठाव घेत आगेकूच करीत आहे.
प्रख्यात सर्जन आलेल्या डॉक्टर अनिल शिंदे यांचे हाता सारखाच महाविकास आघाडीचा तथा काँग्रेसचा पंजा 'हात बदलेगा हालात' असा विश्वास जनतेस वाटू लागल्याने डॉ शिंदे यांचे पाठीशी मोठा जनाधार उभा राहत असल्याचे चित्र आहे. अशी माहिती काँग्रेस नेते संदीपराजे घोरपडे यांनी लोकहितवादीशी बोलताना दिली.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजय सोनार
7972881440

0 Comments