उद्या अमळनेरात संविधान गौरव संकल्प मेळावा व तिरंगा रॅली

ऑल इंडिया संविधान आर्मीचे आयोजन 
उद्या दि. 13 जुलै 25 रोजी सानेगुरुजी विद्यालयाचे प्रांगणात होणाऱ्या या सभेच्या अध्यक्ष स्थानी पुष्पाताई जगन सोनवणे असतील, कामगार नेते जगन सोनवणे हे सभेला संबोधित करतील तर प्रा अशोक पवार हे प्रमुख अतिथी असणार आहेत. जिल्हा व तालुक्यातील अनेक मान्यवर या सभेस उपस्थित राहणार आहेत.
तरी उद्या दुपारी 2 वाजता सर्व संविधान प्रेमींनी हातात तिरंगा व संविधानाची प्रत घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
युवा नेते संविधान रक्षक सैनिक जिल्हाध्यक्ष सुभाष आगळे, सुनंदाताई पानपाटील, रवींद्र वानखेडे, अनिल रायसिंग व सहकारीनी केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments