शिवसैनिक व मान्यवरांनी केले अभिनंदनासह स्वागत.
शिवसेना (शिंदे गट) प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेच्या अमळनेर महिला तालुका प्रमुख पदी भाग्यश्री संदीप बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे तालुक्यात त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
शिवसेना मुख्यनेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अलीभाई आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अशपाक शाह यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.
संघटनेची ध्येयधोरणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे आणि वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी ही जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील मुदतवाढ दिली जाणार आहे.
भाग्यश्री बोरसे यांच्या निवडीचे वृत्त समजताच राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमळनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी व लोकनियक्त नगराध्यक्ष डॉ परिक्षीत बाविस्कर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील, प्रथमेश पवार, शहराध्यक्ष भरत पवार, राहुल कंजर , पंकज शेटे, प्रवीण पाटील यांनीही बोरसे यांच्या निवडीचे स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वात महिला संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यासोबतच समाजातील इतर मान्यवर आणि शिवशक्ती वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या निवडीबद्दल बोलताना भाग्यश्री बोरसे यांनी सांगितले की, "दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन आणि वाहतूकदारांच्या तसेच महिलांच्या न्याय-हक्कासाठी सदैव तत्पर राहीन."
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments