माझ्या या धमकीस घाबरून लोक अवाक झालेत! कुणीतरी मोठी व्यक्ती यांची नातलग आसावी म्हणून ते घाबरले असावेत!!
काही अर्थ लावू देत पण, मी जिंकलो!! मोठी लढाई जिंकली या आवेशात घरी आलो.. कुठल्याशा कारणे गृहमंत्री तोऱ्यात होत्या... 'मी म्हटले आवाज करू नको, माझे तीन शालक मोठया पदावर आहेत... मी त्यांना तक्रार करेल...'
लगेच हस्तक्षेप करीत मुले म्हणाली,
'पप्पा ते आमचे मामा आहेत, आमचीच बाजू घेतील..!'
मी पुन्हा आवाज चढविला तेंव्हा
गृहमंत्रीच ओरडल्या$$---
'अहो आमचे तीन भाऊ आहेत..
तुम्ही नीट बोला.. भाच्यांचे ऐकले नाही तर बहिणीचे मात्र नक्की ऐकतील!' नाही तर 'चक्की पिसिंग, चक्की पिसिंग, चक्की पिसिंग' अशी वेळ येईल तुमच्यावर!
म्हणून सांगते उगीच 'साला-साला' करू नका कारण मी त्यांची लाडकी बहीण आहे!!! माझे भाऊ बहिणीचीच बाजू घेतील ना?
नको डोक्याला ताण! बोंब पण ठोकता येत नाही.. शेवटी 'लंघानं गोत शे...' वाद घातला तर 'खायची व 'झोपायची' मारामारी नको व्हायला!!
गप युती करून बसून पिठले भाकर खात पडलो!!
(कांदा महाग असल्याने कांदा दे असे ओरडल्यास लाटणे मारून फेकेल म्हणून गुमान जेवलो हे सांगायला नको!)
मित्रो,
आमचे
अहिराणीत म्हण आहे...
'वावरमा नाला नको
आणि
घरमा साला नको'
हे मला पटले!
【या विनोदी विषयाचे कोणत्याही राजकीय/शासकीय विषय वा अन्य घटनेशी साधर्म्य जुळून आल्यास कृपया तो निव्वळ योगायोग समजावा!】
*बातमीत प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments