खरे तर आयोजक व पत्रकार यांच्यातील संवाद असल्याने अन्य कुणी मला बोलू द्या असे आग्रह धरायला ही काही आम सभा नहोती हे तीन वेळा आमदार राहिलेल्या डॉ बि एस पाटील यांना कळायला हवे.
आयत्या वेळी यायचे व माईक घ्यायचा या साठी हे व्यासपीठ नाहोते..
आबासाहेब आपली आगळीक सर्वांच्या लक्षात आली. तुम्ही पत्रकार म्हणून निमंत्रित होता का? आयोजकांनी भूमिका मांडल्यावर प्रश्न पत्रकारांनी विचारायचे व उत्तर आयोजकांनी द्यायचे इतका सोपा सरळ मार्ग तीन वेळा आमदार राहिलेल्या आबांना कळू नये? या बाबत तीव्र असंतोष पसरला आहे.
प्रा.अशोक पवार यांची भूमिका रास्त वाटत असून संबंध नसताना मलाही बोलू द्या असा अकारण आग्रह धरणारे डॉ बि एस आबा यांची नाचक्की झाली आहे हे सर्वांचे ओठावर आहे. कुणी तरी भर सभेत त्यांना तुडविले होते हे ते इतक्या लवकर विसरले की काय? असेही या घटने नंतर लोक बोलत होते.
माजी आमदार डॉ आबा हे खा शी संचालक यांचे विरुद्ध बोलायला आले होते की बाजू मांडायला? की कर्मचारी वर्गास न्यायालयाने दिलासा दिल्याने मी तुमच्या सोबत आहे हे सांगायला आले होते?
मुळात माजी आमदार डॉ बि एस पाटील हे आयोजक नहोते, निमंत्रित नहोते, ते पत्रकार देखील नाहीत मग त्यांनी असा धिंगाणा का घातला?
बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाणा! असे या घटने नंतर सर्वत्र बोलले जात आहे!


0 Comments