​पत्रकार ईश्वर महाजन ठरले 'पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड'चे मानकरी.

पंचक्रोशीतुन अभिनंदनाचा वर्षाव
पत्रकारिता ही समाजाचा आरसा मानली जाते. समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे प्रकाश टाकत सकारात्मक दृष्टिकोनातून सत्य मांडण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. अमळनेर तालुक्यातील सहकारी पत्रकार मित्र व 'दैनिक शब्दगंगा'चे उपसंपादक ईश्वर रामदास महाजन यांची व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातून प्रतिष्ठेच्या “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५” साठी निवड करण्यात आली आहे.
​सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियातर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. श्री. ईश्वर महाजन हे आपल्या सर्वसमावेशक तटस्थ लिखाणासाठी ओळखले जातात. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामाजिक विषयांना वाचा फुटली असून समाजात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत २०२५ च्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संदीपजी काळे यांनी स्वतः भ्रमणध्वनीद्वारे ईश्वर महाजन यांचे अभिनंदन केले आणि मुंबई येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहकुटुंब उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
​या यशाबद्दल साप्ताहिक विंगचे जिल्हा अध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेश कुमार काटे, सल्लागार धनंजय सोनार, उमेश धनराळे, मिलिंद पाटील, राज्य प्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे, तालुका अध्यक्ष उमेश काटे व सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अमळनेर तालुका व जळगाव जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राचा सन्मान उंचावल्याबद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments