सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”
दैनिक शब्दगंगाचे उपसंपादक पत्रकार ईश्वर रामदास महाजन यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सकारात्मक कार्याबद्दल प्रतिष्ठेचा “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मुंबईतील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे पार पडलेल्या भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरम, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “महाराष्ट्र भूषण सन्मान कार्य 2025” या कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. 15 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता झालेल्या या सोहळ्यात महाजन यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष मा. ना. ओमप्रकाश शेटे होते. तर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मा. ना. मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.), पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते राणा सूर्यवंशी तसेच व्हॉईस ऑफ मीडिया चे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला यांची विशेष उपस्थिती होती.
माध्यम क्षेत्रातील मान्यवरांमध्ये पुढारी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक प्रसन्ना जोशी, लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे संपादक विशाल पाटील, एनडीटीव्ही मराठीचे संपादक विनोद तळेकर आणि जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
या कार्यक्रमाचे नियोजन व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य महासचिव दिव्या भोसले, राज्य सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, नाशिक विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले तसेच राज्य प्रसिद्धी प्रमुख बापुराव ठाकरे यांनीही महाजन यांच्या कार्याचे कौतुक केले.
गेल्या दोन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाजन यांनी प्रामाणिक, विधायक आणि सकारात्मक पत्रकारितेद्वारे समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी विषयांवरील त्यांच्या बातम्यांमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून त्याच कार्याची दखल म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी त्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल महाजन यांनी व्हॉईस ऑफ मीडिया संघटना व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. दरम्यान, व्हॉईस ऑफ मीडिया अमळनेर तालुका अध्यक्ष उमेश काटे, पदाधिकारी व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
७९७२८८१४४०

Post a Comment

0 Comments