अखेर शिवसेनेत भाकरी फिरली.. सक्रीय व अभ्यासू युवा नेतृत्वास जबाबदारी!

राज्यातील अनेक ठिकाणी संघटनात्मक फेरबदल
सेनेची पदे भूषवून प्रत्यक्षात  'सोयीच्या ठिकाणी' निष्ठा ठेवणाऱ्या पदाधिकारी बद्दल मोठी नाराजी होती, मात्र काम करणाऱ्या व पक्ष धोरणाशी सुसंगत असलेल्या पदाधिकारींना जबाबदारी दिल्याने शिवसेनेत चैतन्य पसरले आहे. 
राज्यभर शिवसेनेच्या निष्क्रिय पदाधिकारींना डच्चू देऊन नव्या नेतृत्वास संधी देण्यात आल्याने सामान्य शिवसैनिक बेहद खुश झाला असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. काही लोकांनी वर्षोनुवर्षे पदे भूषवली मात्र काम वाढवले नाही, पक्षाविरोधात बंडखोरी केली, पक्ष आदेश डावलले, काहींनी पडद्यामागून पक्षाच्या उमेदवारा विरुद्ध काम केले असा प्रकार अनेक ठिकाणी सुरू असल्याच्या सामान्य शिवसैनिकाच्या तक्रारी होत्या, त्याची दखल घेवुन संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
अमळनेर सेना नेतृत्व तडफदार युवांच्या हाती. 
अमळनेर शहर व तालुक्यात देखील भाकरी फीरवण्यात आली असून फर्डे वक्ते असलेले नगरसेवक गुलाब पाटील यांना तालुकाध्यक्ष म्हणून तर उपक्रमशील युवा नेतृत्व भरत पवार व विलास कंखरे यांना शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती देऊन कामास चालना दिली गेली आहे, 
विद्यमान तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांना विधानसभा क्षेत्रप्रमुख तर प्रथमेश पवार यांना उपजिल्हाप्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात गाव तेथे शाखा तसेच शहरात प्रत्येक प्रभागात शाखा सक्रिय करून संघटन वाढीसाठी नियोजनबद्ध काम करू असे गुलाब पाटील व भरत पवार यांनी सांगितले. 
पालकमंत्री गुलाबराव पाटील, मा. आ.शिरिषदादा चौधरी, आ. किशोर पाटील, आ. अमोल पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, वासुदेव पाटील, सरिता माळी, नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांनी नवनियुक्त पदाधिकारीचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्यभर असे संघटनात्मक बदल केले जात असून अभ्यासू, आक्रमक व काम करणाऱ्या तरुण नेतृत्वास जबाबदारी देण्याचे धोरण मा. एकनाथ शिंदे यांनी अवलंबले असल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
79728 81440

Post a Comment

0 Comments