अमळनेर तालुक्यासाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सारबेटे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) म्हणजेच आरपीआय (आ) आणि अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने शाखा उद्घाटन व पक्षप्रवेश मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध समाजघटकांतील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आरपीआय (आ) मध्ये जाहीर प्रवेश केल्याने पक्षाची ताकद कमालीची वाढली आहे.
या मेळाव्याला आरपीआय (आ) चे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत वाघ, भुसावळचे नगरसेवक रोहन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आबा खंडारे आणि तालुकाध्यक्ष यशवंत बैसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत नेरकर यांनी केले तर सूत्रसंचालन अरुण घोलप यांनी केले.
याप्रसंगी प्रा. शामकुमार जाधव, विशाल ब्रह्मे, महेश ब्रह्मे, अनिकेत ब्रह्मे, लखन महाले, अमृत मेराळे, विनोद बिऱ्हाडे, भट्टू बिऱ्हाडे, दयाराम ठाकरे, सरपंच भरवस, राहुल महाले, रमा आबा केदार, दीपक बिऱ्हाडे, गौतम शिरसाठ, किरण बच्छाव आणि अंकुश बिऱ्हाडे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात अल्पसंख्याक आघाडी व शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली: अल्पसंख्याक आघाडी प्रमुख: जुबेर खान मेहमूद खान मेवाती, शाखाध्यक्ष: मुबश्शीर खान गुलाम रसूल खान मेवाती, उपाध्यक्ष: अफरोज खान जमील खान मेवाती, कार्याध्यक्ष: शाबिर खान इस्माईल खान मेवाती, सचिव: जुबेर खान उमर खान मेवाती, सरचिटणीस: मुस्तकीम शाह, चिटणीस: गुलाम रसूल हशीर खान मेवाती, खजिनदार: वकील खान रौफ खान मेवाती, सहसचिव: फारुख खान नशीब खान मेवाती, सदस्य: जुनेद खान याकूब खान मेवाती आणि फारुख खान गनी खान मेवाती
जात-धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी या वेळी केले. ते म्हणाले की, "जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे. आपण सर्व भारतीय आहोत हीच आपली खरी ओळख आहे. पक्षाची बांधणी करताना गरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून द्या." तसेच त्यांनी युवकांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय होण्याचे आवाहन देखील केले. यावेळी प्रभाकर जाधव म्हणाले की, "पक्ष संघटना गावपातळीपर्यंत मजबूत करण्याची गरज आहे. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी संघटितपणे काम करावे." शशिकांत वाघ यांनी "युवकांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन समाज परिवर्तनासाठी कार्य करावे. संघटनात्मक बळ वाढवून सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहावे." असे सांगितले तर अमळनेर तालुका अध्यक्ष यशवंत बैसाने यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात सांगितले की "आपण सर्व एक आहोत आणि समाजातील प्रत्येक समस्या ही आपली सर्वांची आहे. एकजुटीच्या बळावर आपण प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो. सामाजिक सलोखा, विकास आणि न्यायासाठी संघटित राहणे ही काळाची गरज आहे."
कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवीन कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्याला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments