ओमकार नगर रहिवाशांना विश्वासात न घेता होणारे वनीकरण अमान्य!"

अमळनेर येथील मंगळ मंदिराच्या मागील ओमकार नगर परिसरातील नागरिकांनी आज झालेल्या बैठकीत एकमताने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
परिसरातील रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना, चर्चा किंवा विश्वासात न घेता राबविण्यात येत असलेल्या वनीकरण प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
🌳 वनीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च... ❓ हा खर्च नेमका कुणाच्या हितासाठी? ❓ कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणाच्या संमतीने? ❓ स्थानिक नागरिकांच्या मताला का डावलले जात आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावी आणि नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी ओमकार नगर परिसरातील रहिवासी आता संघटित होत असून आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची तयारी सुरू आहे.
📢 संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर खुलासा उद्या...
लोकहितवादी पत्रकार
धनंजय बापू सोनार
📞 7972881440
"जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सहभागातूनच विकास व्हावा, हीच आमची भूमिका."

Post a Comment

0 Comments