आम्हाला माहिती आहे की आटापिटा करून तुम्हाला रोज दिले जाताहेत नव नवे लाडू.....
Plz डॉक्टर, सांभाळा... त्यांचे ऐकले तर तुमचे अस्तित्वच संपून जाईल...
आश्वासने लाख येतील.. यास पूर्वी अनेकांना त्यांनी दिले आहेत.. पण त्यांनी आजवर एकही आश्वासन पुरे केले नाहीय... म्हणूनच तर लोक त्यांना CM म्हणतात... याची आठवण ठेवा..
त्याच्या नादी लागलात तर अस्तित्व संपून जाईल.. हे लिहून ठेवा.
डॉक्टर, शिवधनुष्य आपल्या हाती असताना या भंगारची गरज काय आहे आपल्याला?
जे आहे त्यात गोडवा वाढवा.. याच्या त्याच्या ' घडयाळी ' कडे न पाहता लोकांची कामे करा मने जिंकून घ्या.
काहींचे घड्याळ नुसतीच टिकटिक करते.. दिखाउ आहे.. रोज खोटे बोल रेटून बोल.. असे काही लोक करीत आहेत.. तुम्हाला भ्रमजाल दाखवतील, अडकवतील.. हे लाडू खाण्याचे नाहीत हे समजेल तेंव्हा वेळ निघून गेलेली असेल.. स्वातंत्र्य देवू, मोकळे सोडू, मान मरातब देवू हे नुसते गाडीत बसे पर्यंत.. नंतर दारावर उभे राहावे लागेल... अहोरात्र जे झटले त्यांना हे झाले नाहीत.. ज्यांनी त्याग केला त्या कृषीभूषण याना यांनी फाट्यावर मारले... तुम्हाला काय होणार,?
विचार करा.. पश्याताप करायची वेळ येवू नये म्हणून आताच निर्धार करा. रोज नवे लाडू. पंगती.. आश्वासने हे मायाजाल आहे.. मायाजाल..!! या आधी देखील यांनी कोणते दिवे लावले नाहीत की कुणाला मुक्त स्वतंत्र देवून काम करू दिले नाहीय..
डॉक्टर, तुमच्या प्रती असलेले प्रेम, आदर या साठी हे सांगतोय. सावधगिरीची सुचना समजा फारतर..!
ऐकले तर तुमचाच फायदा. अशी जाणकार व सामान्य लोकांची प्रतिक्रिया व सांगणे आहे.
- लोकहितवादी पत्रकार
- धनंजयबापू सोनार
- 7972881440
0 Comments