मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवेचा उपक्रम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे मनसेच्या वतीने विविध जनहितार्थ उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
राज ठाकरे यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे नेत, समाजसेवेचा वसा जपण्यासाठी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा पुढाकार घेतला होता. याप्रसंगी रुग्ण व त्यांच्या नातेवाजींची विचारपूस करून त्यांना आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण गव्हाणे, महिला तालुका अध्यक्षा किरण निकुंभ, तालुका अध्यक्ष शामकांत बडगुजर आणि शहर अध्यक्ष चेतन बैरागी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णसेवेतून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments