पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालवैज्ञानिकांचा आविष्कार!

अमळनेरात विद्यार्थ्यांनी साकारले विज्ञानाचे नानाविध प्रयोग 

थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या गौरवार्थ साजरा होणाऱ्या 'राष्ट्रीय विज्ञान दिना'चे औचित्य साधून पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अभिनव विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीतून साकारलेले विज्ञानाचे नानाविध अविष्कार सादर केले.

विज्ञानातील उत्क्रांतीवादी विचारांना चालना देण्यासाठी या प्रदर्शनाची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. पहिल्या गटात इयत्ता पहिली ते चौथी, तर दुसऱ्या गटात पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. मानवी जीवन सुकर करणाऱ्या आणि भारताला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या विविध उपकरणांचे व प्रणालींचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी यावेळी केले.

​विद्यार्थ्यांच्या विस्तृत विवेचनाने आणि मांडणीने परीक्षकांना भारावून टाकले. परीक्षकांमध्ये महाविद्यालयीन स्तरावरील ज्येष्ठ तज्ज्ञ डी. के. पाटील, पी. बी. भराटे, पी. आर. भावसार आणि निरंजन पेंढारे यांचा समावेश होता. "आजची पिढी प्रतिभावान असून त्यांचे अफाट वैज्ञानिक ज्ञान प्रयोगातून प्रतिबिंबित होत आहे. हे छोटे वैज्ञानिक भविष्यात भारताचे खरे आधारस्तंभ ठरतील," असे गौरवपूर्ण उद्गार परीक्षकांनी काढले.

प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये प्रामुख्याने व्ही. पी. बडवे, व्ही. एस. अमृतकर, व्ही. जी. बोरोले, डिंपल देसाई, स्वाती माळी, योगिशा महाजन, वाय. पी. ओवे, सविता पवार, श्रावण पाटील, प्रशांत वंजारी, अनंत बागल आणि संपूर्ण चमूचा समावेश होता. 

-लोकहितवादी पत्रकार 

धनंजयबापू सोनार 

79728 81440

Post a Comment

0 Comments