सुवर्णयुगातील अजरामर गाण्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अमळनेर नगरी सज्ज झाली आहे. येथील रसिकांसाठी 'स्वरांजली म्युझिकल ग्रुप'तर्फे एक विशेष सांगीतिक पर्वणी आयोजित करण्यात आली असून, रविवारी १ मार्च २०२६ रोजी धर्मेंद्र आणि लता मंगेशकर यांच्या सदाबहार गीतांची मैफल रंगणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीचे 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा पडद्यावरील दमदार वावर आणि गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरातील मोहिनी यांचा अपूर्व संगम या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या जोडीने अजरामर केलेली एकापेक्षा एक सुपरहिट, रोमँटिक आणि भावपूर्ण गाणी स्थानिक कलाकार आपल्या स्वरांनी जिवंत करणार आहेत.
आयोजनाचा तपशील
जुन्या गाण्यांची आवड असणाऱ्या रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आनंद देणारा ठरणार असून रविवार, १ मार्च २०२६ सायंकाळी ६:०० वाजता जुना टाऊन हॉल, अमळनेर येथे मैफल आयोजित करण्यात आली आहे.
अमळनेरकर रसिकांचे संगीतावर अफाट प्रेम आहे ते पाहता जुन्या गाण्यांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि सुवर्णयुगातील आठवणींना उजाळा मिळावा, या उद्देशाने या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजक किशोर देशपांडे, मिलिंद पाटील व
स्वरांजली म्युझिकल ग्रुपतर्फे आयोजित या सुरांच्या प्रवासात सर्व अमळनेरकर रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments