◆मसापची चम्मतग भाग -3◆
अमळनेर महाराष्ट्र साहित्य परिषदेत एका अदृश्य शक्तीचा हात असून निवडणुकीत त्या शक्तीने पेरलेले दूत घरोघरी जाऊन मत पत्रिकेवर मत नोंदवून घेत चक्क एक मोहीम राबविण्यात आली (त्या संदर्भात झालेल्या निरोप, आदेश, व संबंधित दूतामधील चर्चेचे रेकॉर्डिंग पुराव्या दखल आम्ही वाचकांना सादसर करणार आहोतच.) इतका पद्धतशीर 'गेम' खेळण्याचे कारण काय? मंत्री पदासाठीची निवडणूक होती का? कार्यकारिणीत असलेल्या सदस्यांची निवड करताना देखील या शक्तीचाच दूत काम करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे, या शक्तीने एक प्रमुख व त्याचे भोवती एक टीम उभी केली असून त्यांचा राजकीय डाव साहित्य क्षेत्र बळकावण्याचाच आहे. आणि त्या साठी अशी कुटील नीती आखून साहित्याच्या क्षेत्रात नितिनियमांची पायमल्ली सुरु आहे.
विशिष्ट हेतूने प्रेरित ह्या विकृत मेंदूने पेरलेले त्यांचे चेले-चपाटे कोण याची देखील नावासह माहिती जाहीर करणार आहोतच.
आम्ही साहित्यप्रेमींचा असंतोष परखडपणे मांडताच 'योग्य मांडणी' असे समर्थन करून आमचे कौतुक करणाऱ्या 29 प्रतिक्रिया आजवर आम्हास मिळाल्या असून संकेत म्हणून त्यांची नावे जाहीर न करता काही निवडक प्रतिक्रिया देखील प्रसिद्ध करणार आहोत त्यातील 2 प्रतिक्रिया आज या वृत्तासोबत प्रसिद्ध केल्या आहेत,
कुणी विचारेल किंवा ज्यांना माहीत नाही त्यांचे साठी आम्ही आमची व्यक्तिगत माहिती त्रोटक स्वरूपात देतोय-
मी धनंजय सोनार, विद्यार्थीदशे पासून राज्य पातळीवर विद्यार्थी चळवळीत नेतृत्व, महिला अन्याय विरोधात सातत्याने कार्य, विविध वृत्तपत्रातुन गेली 30 वर्ष स्तंभ लेखन, पत्रकार, मनुवादी षड्यंत्र हे गाजलेले पुस्तक, 'श्री मंगळदेव ग्रह आराधना व उपासना पद्धती' ही पुस्तिका, तिमिराततुनी तेजाकडे या पुस्तकाचे शब्दांकन, सामाजिक विषयावर राज्यभर व्याख्याने, कवितेची तोंड ओळख असलेला छोटासा काव्य वाचक, संघटक. दैनिक डेबूजी व लोकहितवादी घे संपादक म्हणून कार्य. पुजासाहित्य, पुस्तके, बिट कॅण्डी विक्रीचा छोटासा व्यवसाय. आमचे साहित्य चळवळीत थोडे तरी योगदान आहे म्हणून लिहायचा बोलायचा अधिकार असल्याने आम्ही हा प्रपंच करीत आहोत....
तूर्तास अमळनेर मसाप पदाधिकारी व त्यांची प्राप्त माहिती क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत.....
१)संदीप बाबुराव घोरपडे- शिक्षक, नाट्य कलावंत, नाट्य लेखक, उत्तम वक्ता, कल्पक व उपक्रमशील, राज्यभर नाट्य चळवळ चालविणारे, कुमारवयीन मुला मुलींना नाटकाची आवड निर्माण करून कलावंत घडविणारे, विविध सामाजिक राजकीय कामातून थेट जनतेशी संबंध असलेली व्यक्ती. चांगले संघटक व उत्कृष्ट नियोजन कौशल्य असलेले सडेतोड व्यक्तिमत्त्व.
२) रमेश पवार- प्रसिद्ध कवी, त्यांचा काव्य संग्रह प्रसिद्ध असून साहित्य चळवळीत मोठे योगदान आहे हे नाकारून चालणार नाही. अनेक साहित्य संमेलनात काव्य वाचन. बोलघेवडे व्यक्तिमत्त्व.
३) प्रा.डॉ रमेश माने- प्रताप महाविद्यालयात मराठी बिभाग प्रमुख, उच्च विद्याविभूषित, मराठी तज्ञ, लेखक, कवी, समीक्षक, मितभाषी, शालेय जीवनापासून काव्य लेखन व राज्यात अनेक ठिकाणी काव्य वाचनास उपस्थित राहतात, त्यांनी लिहिलेले विद्यापीठ गीत अमळनेरची मान उंचावणारे आहे.
४) दिलीप राजाराम सोनवणे- निवृत्त कॅशियर, विद्यार्थीदशे पासून सामाजिक आंदोलनात सहभागी, साहित्य रसिक, कवी, विविध विषयांवर स्फुट लेखन, सामाजिक प्रश्नांची जाण ठेवत प्रासंगिक भाष्य, साने गुरुजी ग्रंथालय अध्यक्ष, पर्यावरण सहलींचे आयोजक, हस्ताक्षर लेखन कार्यशाळेचे आयोजक, काव्य वाचन व सादरीकरण करण्यात हातखंडा.
५) गोकुळ गोविंदा बागुल- निवृत्त टेलिफोन अधिकारी, हाडाचे शेतकरी, प्रसिद्ध अहिराणी लेखक, वक्ते, शेकडो पुस्तकांचे निर्माते व प्रकाशक, गेली चार दशके विविध दिवाळी अंकातून केलेल्या कथा कवितांना राज्यस्तरीय बक्षिसे मिळवलेले शांत स्वभावी व्यक्तिमत्त्व.
या पुढील भागात इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची माहिती 'मसापची चम्मतग भाग 5 पासून पुढे क्रमशः प्रसिद्ध करणार आहोत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
●मास्तरकी व कवितेचा प्रांत सोडून मसापच्या सदस्यत्वासाठी बी एन चौधरींनी केला आटापिटा? की कुणी त्यांना धरून आणले?
【मसापची चम्मतग भाग -4 उद्या】
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
【ब्लॉग मधील प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.)
0 Comments