​अमळनेरच्या बॉक्सिंगपटूंची नाशिक विभागीय स्पर्धेत सुवर्ण भरारी!

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव!
​शिरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित नाशिक विभाग व धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन अंतर्गत झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत अमळनेरच्या 'बी बॉईज' (B Boys) बॉक्सिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत या चिमुकल्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली.
​या स्पर्धेत अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडली असून ​आदित्य योगेश ठाकूर याने ३० किलो वजनी गटात सुवर्णपदक, ​आदिन्य दीपक संदानशिव याने ३५ किलो वजनी गटात सुवर्णपदक, निल दीपक संदानशिव याने २५ किलो वजनी गटात रौप्यपदक तर ​सार्थक अहिरे याने २८ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले.
​या सर्व यशस्वी खेळाडूंना 'बी बॉईज' बॉक्सिंग अकॅडमीचे प्रशिक्षक भूपेंद्र शिरसाठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर यश मिळवले आहे. ​छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मिळालेल्या या यशामुळे अमळनेर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरांतून खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments