शिरिषदादा यांच्या काही चाहत्यांनी शेगाव येथील गजानन बाबा यांना साकडे घालून दादांना विधानसभा निवडणुकीत विजयी करावे असा नवस कबुल केला. दादा विजयी झाल्यास 201 नारळ अर्पण करणार असल्याचे सांगितले.. इतक्या स्वस्तात बाबा बुक झाले?
खरे तर गजाननबाबा कृषिभूषण साहेबरावदादा यांनी आधीच बुक केले आहेत.. त्यांचे कृपेने ते एकदा विजयी झाले नंतर दुर्दैवाने गाडी पलटी झाली म्हणून त्यांनी आता सोबत महाकाल देखील घेतले आहेत.
अनिलदादा यांनी मंगळग्रह देवतेस स्मरण करून विजय मिळविला हे छापून आले आहे आता त्यांनी देखील जास्त रिस्क नको म्हणून गुवाहटी येथील कामाख्या देवीस देखील 'साकडे' घातले असल्याचे समजते!
अलीकडेच बाशिंग बांधून आलेले प्रकाशभाई यांनी कुठल्यातरी गुजरातच्या बाबाला बुक केले आहे, त्यांचे स्वागत, पाय 'प्रक्षालन' करून व भव्य मिरवणुक काढून त्यांनी अमळनेरात पदार्पण केले. आणखी कुणी-कुणी अनेक बाबा व देवांना साकडे घालून ठेवले असल्याची खबर आहे.
अशात संत गजानन बाबा केवळ 201 नारळात खुश होऊन प्रसाद देतील हा खुळेपणा आहे!
विजयी केल्यास मागील कार्यकाळापेक्षा जास्त धडाक्याने विकासकामे करू असा नवस कबुल करायला हवा.
शिरिषदादा यांचेवर प्रेम असलेल्या सर्वांनी गावागावात प्रचार रॅली काढुन मोहीम हाती घेतली पाहिजे. असे निवेदन दादांच्याच एका समर्थकाने लोकहितवादीला दिले आहे.
थोडा गमतीचा भाग असला तरी त्याचे म्हणण्यात अर्थ आहे हे मात्र नक्की!
मठगव्हाण येथील सोनू गांगुर्डे व त्याचे मित्रांच्या भावना चांगल्या असल्या तरी प्रॅक्टिकल कामावर लक्ष केंद्रित करणे जास्त हिताचे आहे!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments