आगामी अमळनेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते संदीप राजे घोरपडे यांच्या चाहत्यांनी उमेदवारी बद्दल आग्रह धरला असून तिकीट मिळो ना मिळो पण उभेच राहा हा हट्ट चालविला आहे, या बद्दल संदीपराजे घोरपडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी पक्ष शिस्त मानणारा कार्यकर्ता आहे, सतत कार्यमग्न आहे, लोकसेवा सुरू आहे.. त्या मुळे मलाच उमेदवारी मिळेल या बाबत शंका नाहीच. लोकांचे उदंड प्रेम आहे त्यांचा आग्रह आहे. पण पक्ष शिस्त मोडू नये या मताचा मी आहे असे त्यांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
अगदीच आणिबाणीची वेळ आली तर लोकाग्रह टाळता येणार नाही कारण मायबाप जनता व समर्थक हेच माझे बलस्थान आहे.. हे मात्र त्यांनी अधोरेखित केले.
डॉ अनिल शिंदे व संदीपराजे घोरपडे हे दोन्ही उमेदवार जोरदार कामास लागले असून नक्की तिकीट कुणास मिळणार हे आगामी काळात समजून येईलच.
तूर्तास संदीपराजे घोरपडे यांचा जनाधार वाढत असून डॉ अनिल शिंदे यांनी देखील जनसंपर्क वाढविण्यात गती दिली असल्याने काँग्रेसचा उमेदवार कोण या बाबत साशंकता निर्माण झाली आहे.
तिकीट मिळो ना मिळो आमचे आमदार तुम्हीच असा आग्रह धरून घोरपडे यांचे समर्थक त्यांना गळ टाकून आग्रह धरीत आहेत असे चित्र आता तरी दिसत आहे.
डॉ अनिल शिंदे यांचे नातेगोते व दांडगा जनसंपर्क जितका तितकेच संदीपराजे घोरपडे यांचे सामर्थ्य दिसून येत आहे.
डॉ शिंदे यांची आर्थिक कुवत जास्त असली तरी दहा रुपयात आमदार विकत घ्या अशी अनोखी शक्कल घोरपडे यांनी लढवून मत व दहा रुपये द्या मी 5 वर्ष तुमचा नोकर राहील असे आश्वासन लक्ष वेधून घेत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments