डॉ.अनिल शिंदे यांनी वेळ भरून काढण्यात मिळविले यश!

आघाडीतील सर्वांची एकत्रित मोट बांधून जोरदार मोर्चे बांधणी!! 
अमळनेर मतदार संघात डॉ अनिल शिंदे यांना उशिरा पर्यंत तिकिटासाठी प्रतीक्षा करावी लागली, अनिलदादा पाटील व शिरीषदादा चौधरी यांचे आधीच ठरले असल्याने ते तयारीस लागले होते. 
डॉ शिंदे यांचे जनसंपर्क सुरूच असले तरी नक्की जागा कुणाला सुटणार? नक्की तिकीट कुणाला मिळणार यात वेळ गेला. 
उशिरा का असेना डॉ अनिल शिंदे यांचे पाठीशी आघाडीतील सर्व नेते उभे राहिले. 
अचानक भयानक प्रचार यंत्रणा राबवित त्यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असल्याने अमळनेर मतदार संघात डॉ अनिल शिंदे यांचा दावा कायम आहे या बाबत साशंकता नाही. 
जसा निवडणूक प्रचारास रंग येईल तसे चित्र बदलेल असे असले तरी डॉ अनिल शिंदे यांचा चढता आलेख कायम राहील असे आज तरी दिसते. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments