डॉ अनिल शिंदे करू शकतात अनिल भाईदास यांची घर वापसी?

 शिरिषदादा की अनिल शिंदे हा प्रश्न अलाहिदा ! 
पण अनिलदादा भाईदास पाटील देखील देऊ शकतात चकमा!!
राजकारण हा क्रिकेट सारखा अनिश्चित खेळ झाला आहे, त्या मुळे अमळनेर मतदार संघात चमत्कारिक निकाल लागू शकतो, अनिलदादा यांचे नामनिर्देशन पत्र भरतांनाच्या प्रचार रॅलीत जितकी संख्या होती त्याचे तिप्पट शिरीषदादा यांचे फॉर्म भरताना होती, 
तशीच जत्रा डॉ अनिल शिंदे व सहकारींनी जमा केल्याने अमळनेर मतदार संघात करिष्मा होऊ शकतो. 
एका अर्थी अनिल शिंदे हे मंत्री अनिल भाईदास पाटील यांची घरवापसी करतील की काय असा दावा केला जात आहे. 
जर अनिल भाईदास पाटील यांची घर वापसी होत असेल तर शिरिषदादा की अनिल शिंदे? हे उत्तर 23 तारखेस मिळेल! 
पण मागील वर्षी झोळी पसरून निवडणूक लढणारे अनिल पाटील यांचे उत्पन्न 3 कोटीने वाढले असल्याने ते देखील मुक्त हस्ताने जनतेस खुश करून चमत्कार करतील तर नवल म्हणावे लागेल! 
घोडा मैदान जवळ आहे 
सत्य समोर येईलच!! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments