संत सखाराम महाराज यांचे पवित्र प्रांगणात जणू शिरीषदादा यांचीही जत्रा!

बोरी नदी पात्र व वाडी चौकासह सर्वत्र समर्थकांची मांदियाळी!
माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या नामनिर्देशनाला समर्थन म्हणून पंचक्रोशीतील महिला पुरुषांनी अभूतपूर्व हजेरी लावली!
पैलाड, बोरीपात्र, वाडी चौक, तिरंगा चौक, तहसील कार्यालय परिसरात मुंगी शिरायला जागा नहोती, वाहतूक नियंत्रण करण्यात पोलिसांची तारांबळ उडाली,
संत सखाराम महाराज यांचे प्रांगणात जणू यात्रा भरली होती की काय असा जनसागर लोटला होता.
शिरीष दादा चौधरी यांचेवर जणू आजच विजयाचा गुलाल टाकला गेला की काय, असे चित्र आज तरी दिसून आले.
मोठ्या प्रमाणावर महिला देखील उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे सर्व समाजातील लोक उत्फुर्त हजर होते.
शिरीष चौधरी यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे हे पुरावे म्हणावे लागतील.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments