डॉ अनिल शिंदे यांचे उमेदवारीने अमळनेर मतदार संघात आली रंगत!

तिहेरी लढतीत तिघेही मातब्बर उमेदवार!!
डॉ.अनिल शिंदे वेळ भरून काढणार असा काँग्रेस व अनुयायी सर्वांचा विश्वास.
उशिरा तिकीट मिळाले तरी सर्व काँग्रेस प्रेमी व उबाठा, एस पी राष्ट्रवादीचे नेते /कार्यकर्ते डॉ अनिल शिंदे यांचे पाठीशी उभे राहतील असे वाटते.
डॉ शिंदे अनुभवी व आर्थिक सक्षम असल्याने ते इच्छुक उमेदवारांची एकत्रित मोट बांधतील अशी खात्री व्यक्त होत आहे.
डॉ अनिल शिंदे यांचे सोबत तिकिटाचे स्पर्धेत असलेले संदीप राजे घोरपडे, के डी पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहील तशीच गत महिनाभर प्रा अशोक पवार, तिलोत्तमा पाटील, प्रशांत निकम, उमेश पाटील आदी देखील स्पर्धेत होते परंतु जागा काँग्रेसचे वाट्यास गेल्याने या नेत्यांची भूमिका नक्की काय राहील हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे, हे सर्व एकत्र आले तर अनिल भाईदास पाटील बॅकफुटवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज तरी तिरंगी व तगडी लढत होईल असे चित्र नक्की आहे!
*जाहिरात

-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments