बंडोबांचे प्रकार : एक मार्गदर्शिका..! प्रभावी उपाय!!

आजच्या दैनिक सकाळ मधील 'ढिगटांग' या सदरातील एक सारांश !!
बंडखोर उमेदवार 2 प्रकारचे असतात.. पहिला व्यावसायिक व दुसरा हौशी! खरेतर अपरिपक्व!!
प्रोफेशनल बंडोबा थंड करायला (हँडल करायला?) थोडे सोपे जाते.. कारण आपल्याला बसायचेच आहे हे त्यांना अर्ज भरतानाच ठाऊक असते. थोड्या वाटाघाटी करून मिळेल ते पदरात पाडून घेणे हे त्यांचे टार्गेट असते.
त्यातही काही बंडोबांना पक्ष नेतृत्वच उभे करते.. हा पंप मारून विरोधातील उमेदवाराची भंबेरी उडवणे, अंदाज चुकवणे वगैरे धोरण असते.
पण हौशी बंडोबाचे तसे नसते.
त्यांना वाटते की आपणच निवडून यावे याची जनता कधी पासून वाट पाहत आहे. हे म्हणजे नवोदित कवी सारखे असते.. काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला की साहित्य विश्वात खळबळ माजेल असा भ्रम... तसे या हौशी बंडखोरांना असतो..
अशा हौशी बंडखोर उमेदवारांच्या फुग्याला टाचणी टोचली की भ्रमाचा भोपळा फुटतो.
तसे अनेक बंडखोर हार्मलेस असतात. पण काही जाम ऐकत नाहीत.. त्यांना थेट पण मानाने फ़राळास बोलवावे.. उभे का बस ना$$ म्हणत 'खुर्ची' द्यावी.
थोड्या वेळात हेच वाक्य दरडावून उच्चारावे! वरमला-नरमला की एखादे निवडक आश्वासन द्यावे! काम होऊन जाते!
सलाम ब्रिटिश नंदी! (कोण या नावे लिहितो त्यांचे नाव माहीत नाही.)
राजकीय पक्ष व ज्यांना बंडखोर उमेदवारांचा त्रास आहे त्यांनी हा उपाय करून बघावा!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments