विजयाचे दावेदार असलेले डॉ अनिल शिंदे यांनी उशिरा तिकीट मिळाले तरी प्रचारात मात्र जोरदार आघाडी घेतली होती.
नंतर मात्र शिरिषदादा चौधरी व अनिलदादा यांचे जोरदार कॅम्पेन व वाढता प्रतिसाद पाहता डॉ अनिल शिंदे यांचेशी अनिलदादा यांनी सेटिंग केल्याचे बोलले जात आहे.
पुरावे अनेक आहेत त्यातील एक नमुना👇🏾
किरण पाटील व चेतन राजपूत यांचे कडे मंत्री अनिलदादा यांचे प्रचाराची सूत्रे हाती होती हे सर्वश्रुत आहे.
शेवटच्या क्षणी आपण विजयी होत नाही असा अंदाज आल्याने वा त्या प्रकारच्या बातम्या डॉ शिंदे व आघाडी पर्यंत नीट पोचवून 'आपलाच' निवडून येऊ द्या अशी सोय करून 'तडजोड' तर झाली नाही ना?
फोटोत डॉ शिंदे यांचे सोबत किरण पाटील व डॉ शिंदे यांचे पाठीमागे बसलेली व्यक्ती वाहनात एकत्र पाहून धक्का बसला.
निवडणूक काळात डॉ अनिल शिंदे व शिरिषदादादा यांचा धसका घेतलेल्या अनिलदादा यांचे सोबत असलेले किरण पाटील डॉ शिंदे यांचे सोबत असलेली ही छबी बोलकी असल्याचे आरोप होत आहेत.
ही छुपी युती असून महाविकास आघाडीच्या नेत्या व कार्यकर्ते यांचा विश्वासघात होता की काय?
मोठा खर्च झाल्याने अखेरच्या क्षणी आर्थिक तडजोड होऊन शिरिषदादा यांचा पराभव व्हावा म्हणून हा प्रयत्न होता का? अशी शँका उपस्थित होत आहे.
सत्य काय याचे उत्तर डॉ अनिल शिंदे, महाविकास आघाडीचे नेते, किरण पाटील व जनता देऊ शकते.
पण हा फोटो पाहता 'कुछ तो गडबड है दया' असा संशय आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments