महाविकास आघाडी नेत्यांनी सोबत राहून कापला डॉ शिंदेचा गळा?

2019 ला असाच कापला होता शिरिषदादा याचा पत्ता!
निवडणूक विश्लेषण भाग -2
अमळनेर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक नेते व अन्य प्रमुखांनी डॉ अनिल शिंदे यांचे सोबत राहून त्यांचे खाऊन त्यांचाच केसाने गळा कापल्याची तक्रार आहे.
अनिलदादा विजयी होताच त्यांचा सत्कार करायला तिलोत्तमाताई व मुन्ना शर्मा, मनोज दाजीबा यांचे सह कोण 'आघाडीवर' होते?
जनतेने विचार करावा.
असाच प्रकार शिरिषदादा चौधरी यांचे सोबत 2019 ला घडला होता, हातात कमळ व बोट घड्याळ कडे दाखवून मते मागून शिरिषदादा यांचे खाऊन कुणी केसाने गळा कापला हे देखील जनता ओळखून आहे.
एकूणच डॉ अनिल शिंदे यांचे खाऊन ताटात छेद करणारे कोण होते हा सर्वज्ञात इतिहास आहे.
डॉ अनिल शिंदे यांची शेवटची टर्म होती असे म्हणू शकत असलो तरी त्यांनी काँग्रेस सोडल्यास त्यांना पुन्हा नवजीवन प्राप्त होऊ शकते.
किमान आपल्याला धोका देणाऱ्या लोकांचा येत्या प स, जी प, व नगरपरिषद निवडणुकीत डॉ शिंदे यांनी वचपा काढावा असे जनमत आहे.
विजेत्या अनिलदादा यांचे लोकशाही परंपरे नुसार अभिनंदन पण महाविकास आघाडीत अंतर्गत फूट पडली होती व काही डॉ अनिल शिंदे यांचे नेत्यांनी अनिलदादा पाटील यांची वाट धरली होती या डॉ शिंदे यांचे आरोपात तथ्य आहे हे नक्की!!! जो जिता वो सिकंदर! हेच खरे!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments