देश विदेशातील भाविकांची मंगल यात्रा!

अमळनेर श्री मंगळ मंदिरावर अलोट  गर्दी!!
सकाळी 6 वाजेपासून देश-विदेशातील मंगळ भक्तांनी अमळनेर येथील जगप्रसिद्ध श्री मंगळदेव ग्रह मंदिरात उपस्थिती लावली, भक्तांची मोठी रीघ लागली असून गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, राजस्थान, आदी प्रदेशातील भक्त व अनेक विदेशातील भक्त देखील दिसून आले. 
महाराष्ट्रभरातून हजारो भक्त सहपरिवार दाखल झाले आहेत. 
भक्तांचा उत्साह मोठा तसा मंगळ मंदिर व्यवस्थापक व सेवेकरी यांच्याही उत्साहाला उधाण आले आहे. 
या अलोट गर्दीमुळे मंगळ मंदिर परिसरात विविध व्यावसायिकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. 
शहतातील रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिक, लॉज, चहा, नाश्ता, सह अनेक व्यवसाय करणारे खुश असून लाखोंची उलाढाल होत असल्याने अमळनेरात पैसा खेळता झाला आहे. 
डिगंबर महाले उर्फ राजू महालेसर व मंगळ ग्रह सेवा  संस्था यांचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवेकरी यांनी चोख व्यवस्था ठेवली असून मंगळभक्त समाधानी होऊन आशीर्वाद देत आहेत. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments