अन्य लोकांना सोडले वाऱ्यावर?
अनेक सेतू केंद्र चालकांची लोकहितवादी कडे कैफियत!!
अमळनेर शहरात डझनावारी सेतू केंद्र दिले असून त्यातील काहींना तहसीलदार यांचा गोल शिक्का देण्यात आला आहे, अनेकांचा वशिला नसल्याने त्यांना मात्र असा शिक्का वा सुविधा देण्यात आल्या नाहीत.
या बाबत काही सेतू केंद्र संचालक यांनी आवाज उठवला तेंव्हा तहसीलदार यांनी बेकायदेशीर आहे हे मान्य करून शिक्के जमा करीत आहोत असे उत्तर दिले.
ते खरे, बनावट की तहसील कार्यालयातील कुणाच्या आशीर्वाद मिळवून वापरले जात आहेत?
मा.तहसीलदार साहेबांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
न्याय सर्वाना हवा ही अपेक्षा.. परंतु शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार फक्त काही लोकांना व काही वाऱ्यावर? हे योग्य नाही.
सरजी, आम्ही पुरावा असल्या शिवाय बोलत वा लिहीत नाहीत हे ध्यानात घ्यावे.
*बातमीत प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440




0 Comments