प्रशासनातर्फे शिवाजी उद्यानासह नाट्यगृह येथिल अश्वारूढ शिव पुतळ्याला वंदन!

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अमळनेर आ. अनिलदादा पाटील व प्रशासकीय अधिकारीनी केले शिवपूजन!!
नाट्यगृहातील पुतळ्याचेही सामूहिक पूजनास आ. अनिलदादा पाटील सह अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
अमळनेर येथील प्रशासनातर्फे शिवजयंती निमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी राज्य गीत सादर करण्यात आले. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, परिविक्षाधीन पोलीस निरीक्षक बारबोले, पोलीस निरीक्षक विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, महेश गर्गे, घनश्याम पाटील,राजेंद्र यादव, संजय चौधरी, चेतन राजपूत, प्रसाद शर्मा, अरुण पाटील, नितीन  शाह, उज्वला शिरोडे, संगीता जैन, संतोष बिऱ्हाडे, महेश जोशी, प्रभाकर पाटील, गोविंदा बाविस्कर या सह छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सदस्य व नप कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.अनिलदादा पाटील  व मान्यवरांनी नाट्यगृहातही दिली मानवंदना! 
नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे सामूहिक पूजन, आ. अनिल पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
797288440

Post a Comment

0 Comments