दहिवद ता.अमळनेर येथे दिनांक १६/२/२५ रोजी माध्यमिक शाळेत माजी विद्यार्थी विद्यार्थीनी एकत्र आले, तब्बल ४३ वर्षा नी दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.
या उपक्रमाची कल्पना शाळेचे माजी विद्यार्थी तथा नासिक ग्रामीण येथिल पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले यांचे संकल्पनेतुन रविंद्र मोरे , कैलास महाराज, विजय वाणी यांचे प्रयत्नातुन संपन्न झाला. स्नेह मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत मुख्याध्यापक यू.ओ. चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून सुषमा वासुदेव पाटिल (संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति अमळनेर), संस्थेचे चेअरमन जयवंत पाटिल, सचिव सुभाष पाटिल होते, मुख्याध्यापक आसाराम सैदाणे व तत्सम काळातील सर्व सेवानिवृत्त गुरुवर्य यू ओ चौधरी, जे बी शेलकर, बी एन लोहार, बी ए लंबोळे, ए बी पाटिल, गुलाबराव बोरसे, कार्यालयीन अधीक्षक रामकृष्ण सुतार, आनंदा बापू पाटिल यांचा पुष्पहार शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ताम्र दीप व कपडे देवून यथोचित सत्कार वासुदेव देसले यांनी केला,
माजी विद्यार्थीनी सुरेखा पाटिल बड़ौदा, रत्न प्रभा सोनार कल्याण, प्रतिभा देशमुख ठाणे , अनुपमा कांकरिया धुले, राजश्री अढ़ाळे, जलगांव, यांचाही 'माहेर ची साड़ी' शाल श्रीफळ, पुष्पहार, ताम्र दीप, व स्मृति चिन्ह भेट देवून सुषमा वासुदेव पाटिल यानी सत्कार केला.
४३ वर्षानी पुनः एकत्र विद्यार्थी व शिक्षक आले याचा मनस्वी आनंद तर होताच परंतु काही गुरुवर् विद्यार्थ्याना सोडून गेले म्हणून कार्यक्रमचे सुरवातीस दिवंगत कोल्हे, एस डी पाटिल, प्रभाकर पाटिल, सोनवणे,मधुकर रडे, मधुकर सोनार, शिंपी, वर्ग बंधु प्रभाकर महाले याना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली व कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली.
मान्यवरांचा सत्कार झालेनंतर विद्यालयाचे सचिव सुभाषराव हिम्मतराव पाटिल यानी संस्थेच्या वतीने शाळेचे माजी विद्यार्थी वासुदेव देसले यांची पोलिस उपाधीक्षक पदावर पदोन्नति झालेने त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफल देवूंन सत्कार केला व सर्व माजी विद्यार्थी ४३ वर्षांनी आमचे शाळेत पुनः एकत्र आले म्हणून सर्वांचे कौतुक व आभार मानले, सर्व शिक्षक विद्यार्थी यानी ४३ वर्षपूर्वीचे आठवणीना उजाळा दिला, चौधरी व लंबोळे यानी पुनः वर्गात जावुन माजी विद्यार्थी याना शिकविले!
जे विद्यार्थी सेवानिवृत झाले तेही वर्गत बसुन चौधरी यानी ४३ वर्षपूर्वी शिक़वलेले गणित आठवणीत आणले,नमूद वर्गात माजी विद्यार्थी म्हणून पोलिस उपअधिक्षक वासुदेव देसले, ह. भ.प. कैलास पाटिल, प्रा.रवींद्र मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेन्द्र पाटिल, संजीव प्रतापराव सोणवने, मुख्याध्यापक धनंजय खंडेराव सूर्यवंशी, विजय भाऊराव पवार, रवींद्र विश्वनाथ महाजन, सेवानिवृत जवान कैलास दगड़ू माळी, सेवानिवृत्त पोलिस हवालदार रोहिदास सोनावणे,सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी विजय वाणी, सेवानिवृत सचिव रमेश पोपट अहिरे तसेच आदर्श शेतकरी नागरिक राजेंद्र राजधर पाटिल, राजेंद्र धोंडू पाटिल, राजेंद्र डोंगर पाटिल, कैलास बोरसे, शांताराम सुकलाल माळी, गोकुल काशीनाथ पाटिल,शिवाजी विश्राम पाटिल,पंडित राजेन्द्र पद्माकर मांडे, विश्वासराव पाटिल, अकबर चांद खाटिक आदी हजर होते.
हा मेळावा यशस्वी होन्यासाठी साठी माजी विद्यार्थी dysp वासुदेव देसले, रविंद्र मोरे, कैलास पाटिल, विजय वाणी, राजेन्द्र पाटिल यानी विशेष प्रयत्न केले व् संस्थेचे चेअरमन जयवंत गुलाबराव पाटील यांनी सहकार्य केले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments