खाजगी कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींनी द्रो रा कन्या शाळेसह सर्वत्र केले अतिक्रमण!

हे फलक लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी.
अमळनेर शहरात प्रत्येक शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालय परिसरात डिजिटल बोर्ड लावून मांडला हैदोस. 
शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक, नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे गंभीर दुर्लक्ष झाले आहे की त्यांनाही या जाहिरात केल्या बद्दल काही वाटा मिळाला आहे? अशी शंका उपस्थित होत आहे. 
अमळनेर द्रो रा कन्या शाळेच्या आवारात तर भिंती कुठे,? शाळा कुठे? रस्ता कुठे हेच दिसत नाही. इतके उदंड पीक या कोचिंग क्लासेसच्या जाहिरात फलकांचे आले आहे. 
शहरातील चौकाचौकात अनधिकृत जाहिरातीचे अनेक फलक लागले आहेत. न प व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कारवाई केली पाहिजे व ज्या शाळा महाविद्यालयाचे परिसरात असे कोचिंग क्लासेसचे फलक लावले आहेत ते तात्काळ काढून ज्यांनी लावले त्यांचेवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments