दि. २४ जून २०२५ रोजी ४९ महाराष्ट्र बटालीयन एनसीसी, अमळनेरला गटमुख्यालय औरंगाबाद येथील कमांडर ब्रिगेडिअर अनुप बरबरे यांनी भेट दिली. त्यांना बटालीयनचे समादेशक अधिकारी कर्नल अमित रे यांनी युनिट विषयी पूर्ण माहिती दिली, यावेळेस बटालीयनचे नेमलेले एएनओ, पीआय स्टाफ, सिव्हील स्टॉफ, जीसीआय हजर होते, कमांडरसाहेबानी प्रताप कॉलेज येथील समितीस भेट देऊन एनसीसी विषयी विचारणा केली, त्यांनी ऐएनओ, पीआय स्टाफ तसेच सिव्हिल स्टाफ ला एनसीसी अजून कशी ॲक्शन फास्ट करता येईल यावर मार्गदर्शन केले.
तसेच एनसीसी मुळे, एसएसबी, सीडीएस तर्फे आर्मी अधिकारी तसेच अग्निवीर कसे होऊ शकतात व त्याचा कसा फायदा एनसीसीच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो याचे महत्त्व पटवून दिले. कोणत्याही संरक्षण खात्यात जाण्यासाठी एनसीसी हा प्लॅटफॉर्म उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले
ब्रिगेडिअर साहेबानी गार्ड ऑफ ऑनर तसेच बटालीयनचे कामाची पहाणी करूने कौतुक केले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार


0 Comments