सौ भारती रमाकांत माळी यांच्या उमेदवारीचे प्रभाग 13 अ मध्ये जोरदार स्वागत!

सर्व स्तरातील मतदारात नवचैतन्य !!
प्रेमळ, सोज्वळ व शिक्षित अशा सामान्य घरातील उमेदवार सौ भारती रमाकांत माळी  ठरल्या नगरसेवक पदाच्या प्रमुख दावेदार!

🌸 अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ – वॉर्ड क्र. १३ अ (महिला राखीव)

अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत वॉर्ड क्र. १३ (महिला राखीव) साठी सौ. भारती रमाकांत माळी यांच्या उमेदवारीने वॉर्डात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
सामान्य घरातून आलेल्या, प्रामाणिक सेवाभावाने प्रेरित आणि जनसंपर्कात सक्रिय असलेल्या सौ. माळी या नागरिकांच्या मनात आशेचा किरण बनल्या आहेत.
⚖️ “ॲड. रमाकांत माळी यांच्या समाजसेवेचा वारसा – आता भारतीताईंच्या नेतृत्वात”
सौ. भारती माळी या सुप्रसिद्ध वकील आणि समाजसेवक ॲड. रमाकांत माळी यांच्या पत्नी आहेत.
ॲड. माळी हे गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्याच प्रेरणेने सौ. भारती माळी यांनी समाजसेवा आणि वॉर्डाच्या विकासासाठी राजकारणात प्रवेश केला आहे.

💧 विकासाची दिशा – रस्ता, पाणी, वीज, सुशोभीकरण!

“रस्ता, पाणी, वीज, सुशोभीकरण आणि नागरिकांचा विकास” हा सौ. माळी यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे.
प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि वॉर्ड स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित व्हावा, हा त्यांचा ठाम निर्धार आहे.

🌺 महिलांच्या नेतृत्वाची नवी आशा – वॉर्ड १३ साठी सौ. भारती माळी!

वॉर्डातील प्रत्येक समस्येचा प्रत्यक्ष अनुभव घेत त्यांनी विकासाचा ठोस आराखडा तयार केला आहे.
त्यांच्या लोकसंपर्कामुळे वॉर्डातील सर्व समाजघटक त्यांच्याशी जोडले गेले आहेत आणि नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

🙌 “सेवेची परंपरा, पारदर्शक कार्यप्रणाली आणि जनसंपर्क – हेच आमचं बळ!” 
अनेक मातब्बर उमेदवार निवडून देण्यात निर्णायक भूमिका बजावणारा लोकसेवा ग्रुप, समाजातील जेष्ठ श्रेष्ठ,वयोवृद्ध, समाज धुरीण हे ऍड.रमाकांत माळी व सौ भारती रमाकांत माळी यांचे साठी कामास लागले आहे.
ॲड. माळी परिवार समाजाशी सदैव जोडलेला असून पारदर्शक कार्यशैली आणि प्रामाणिक सेवेमुळे नागरिकांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे. सर्वांच्या सुख दुःखात धावून जाणारे, सर्व जात-धर्मातील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, आप्त स्वकीय व जागरूक मतदारांचा मोठा गोतावळा असलेले रमाकांत माळी हे ओळखले जातात. त्या साठी प्रभागातील सर्वच एक ध्येय घेवुन एकदिलाने व भावनेने सौ. भारती माळी यांचे उमेदवारीचे समर्थन करीत आहेत. म्हणून वॉर्ड १३ च्या सर्वांगीण विकासासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

💐 “आपला आशीर्वाद व बहुमोल मत – आपल्या वॉर्डाच्या  विकासासाठी!”
✋ सौ. भारती रमाकांत माळी यांना पाठबळ देऊन प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आशीर्वाद द्या व आजच विजय निश्चित करा!
🗳️ अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५
वॉर्ड क्र. १३ अ (महिला राखीव)
🌸 सौ. भारती रमाकांत माळी आपला आशीर्वाद घ्यायला येत आहेतच.! 🌸
🕊️ “विकासाची नवी दिशा, महिलांच्या नेतृत्वाची नवी आशा — वॉर्ड १३ मध्ये नवा उत्साह!”
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments