गत वेळी यांचे पत्नीस निवडून दिले पण विकास कामे झाली नाहीत ! म्हणून आता यांना समर्थन म्हणजे प्रभागातील बहुसंख्य जनतेचा अवमानच!!
गत निवडणुकीत जनतेने यांचेवर मोठा विश्वास दाखवला, पत्रकार आहे, बोलून लिहून दबाव टाकून कामे करेल या भाबड्या आशेने लोकांनी भरभरून मते दिली व त्यांचे पत्नीस निवडून दिले, परंतु स्वतः नगरसेविका या प्रभागाच्या विकासासाठी काहीही ठोस करू शकल्या नाहीत, प्रभागातील कामासाठी त्यांनी न प सभेत कोणतेही ठराव मांडले नाहींत किन्वा आवाज उठविला नाही. तसेच पत्रकार म्हणून सर्वत्र मिरवणारे दीपक पाटील जे अदृश्य झाले ते थेट आता निवडणूक लागताच अचानक चमकोगिरी करू लागले. पाय पडू लागले. पावसाळा येताच छत्री उघडावी तसे दीपक पाटील यांनी जयहरी म्हनत गाठीभेटी सुरू करून आपन किती विकासपुरुष आहोत हे सांगणे सुरू केले आहे, खरे तर पुष्पलताताई व साहेबरावदादा यांचे मुळे जी काही कामे झालीत त्याचे श्रेय कुणीही घेऊ नये हे स्पष्ट करून प्रभागातील जनता आता या चमकोगिरीला फसणार नाहीत, तसेच जर कुणी आघाडी वा पक्षाने यांना तिकीट दिले तर तो प्रभागातील बहुसंख्य मतदारांचा अवमान असेल असे मत प्रभाग 7 मधील अनेकांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
या भागातून अनेक महिला पुरुष व युवा मतदारांचा कौल घेतला असता वरील भावना लक्षात आल्या त्या वाचकांचे समोर जशाच्या तश्या ठेवत आहोत.
त्यांचे समर्थक वा स्वतः दीपक पाटील यांना याचे खंडन करायचे असेल तर त्यांनी त्यांचे कामाचे स्वरूप लेखी स्वरुपात पाठविले तर ते देखील ठळक प्रसिद्ध करू. तसेच प्रभागातील अन्य उमेदवारा बद्दल पॉझिटिव्ह निगेटिव्ह मते कळवली तर ते देखील प्राधान्याने प्रसिद्ध करू. कारण आम्ही तटस्थ पत्रकारिता करतो.. त्यांची बाजू देखील तितक्याच सक्षमतेने मांडू हे नक्की.
जरूर 7972881440 या व्हाट्सअप वर कळवा.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापु सोनार
7972881440
0 Comments