हाकेच्या अंतरावर निवडणूक आली असताना आघाडी युती की स्वतंत्र हा तिढा सुटलेला नाही, आजची आतली खबर अशी की सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहेत.
नामनिर्देशन साठी 2 दिवस हाती असताना अद्याप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत की प्रभागात कुणाला फायनल करण्यात आलेले नाही. नगराध्यक्ष पदासाठी अनेक मातब्बर इच्छुक असताना सर्वच प्रमुख नेत्यांनी सर्वाना वासावर ठेवून खेळ मांडला असल्याचे चित्र आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यास मोठी धावपळ होईल मात्र त्याचे गांभीर्य नाही.
एकूणच महायुती व महाआघाडी सह अनिलदादा यांची शहर विकास आघाडी, शिरिषदादा मित्र परिवार आघाडी, यांनी देखील अद्याप कोणत्याही ठोस निर्णयाकडे वाटचाल दिसत नाही वा त्यांच्यात एकमत दिसून येत नाहीय.
नुकत्याच हाती असलेल्या वृत्तानुसार गिरीश महाजन यांनी भाजपा स्वतंत्र लढेल या बाबत ग्रीन सिग्नल दिल्याने स्मिता वाघ यांचे कडून अमळनेरात भाजपाच्या काही उमेदवारांना तयारी करण्यासाठी आदेश देण्यात असल्याचे वृत्त आहे.
नगराध्यक्ष पदासाठी कानाखालचा उमेदवार शोधणे, तिकडे तिकीट मिळाले नाही तर नाराज उमेदवाराला जवळ करणे असे डावपेच सुरू असून भाजपा, शिरिषदादा चौधरी यांचे नेतृत्वाखाली शिंदे सेना, अनिलदादा यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी किंवा शहर आघाडी असे स्वतंत्र लढणार असे आता तरी दिसत आहे. यात काँग्रेस व शरदपवार गटाकडून मात्र अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाहीय.
एकूणच आघाड्या युतीची बिघाडी झाली असून येत्या 2 दिवसात चित्र स्पस्ट होईल. मात्र स्वबळावर निवडणूक झाली तर कुणाचे वर्चस्व कमी होईल? कुणाला फटका बसेल? या बाबत 'लोकहितवादी'चा स्पेशल रिपोर्ट उद्या!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments