अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन आज शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी अमळनेर शहरात करण्यात आले आहे.
अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दुपारी 3.30 वाजता हा मेळावा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.तर मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे नेते आ.सना मलिक,माजी आ.जिशान बाबा सिद्दीकी, माजी आ. फारूक शाह, अल्पसंख्याक समाजाचे युवा नेतृत्व नजीब मुल्ला व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार व इतर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. सदर मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून शहर तालुक्यातील मुस्लिम समाजाला निमंत्रित करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यास शहर व तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अमळनेर शहर व तालुका विकास आघाडीच्या सर्व घटकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष अलीम मुजावर व शहराध्यक्ष कलीमोद्दीन शेख यांनी केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments