काल व आज सानेगुरुजी पुतळ्या समोरून शेकडो समर्थकांसह भावी नगरसेवक फॉर्म भरायला गेले पण एकाही नालायकाला गुरुजींना वंदन करावे, एखादा हार टाकावा क्षणभर थांबावे असे वाटले नाही.
आज सायंकाळी देखील गुरुजी त्याच विनम्रपणे हात जोडून नगरपरिषदेकडे पाहत उभेच होते.
सत्तेत येऊ इच्छित लोक आपल्याला विसरले हे चिंतन करीत असावेत.
उमेदवाराचा जयघोष करणाऱ्या समर्थक झेलकरी टाळकरी यांच्या पैकी एखाद्याला देखील आठवण द्यावीशी वाटली नाही का,?
उद्या हे निवडून आल्यावर मात्र प्रत्येक भाषणात गुरुजींचे नाव मात्र आवर्जून घेतील. अशा निर्लज्ज व नालायकांचा राग येणे स्वाभाविक आहे.
थोडी जरी चाड असेल तर उद्या यांनी खास पूज्य सानेगुरुजी यांना अभिवादन करण्यासाठी यावे व झालेल्या विस्मरणाबद्दल प्रायश्चित्त घ्यावे अशी अपेक्षा केली जात आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments