अमळनेर मतदार संघ राखीव होताच सर्व पक्षात उदासीनता!

अनुसूचित जाती तेंव्हा वाळीत आणि आताही दुर्लक्षितच!! 
पुरोगामी वारसा सांगणाऱ्या अमळनेरात अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना सर्व पक्षांनी सिरीयस घेतलेले दिसत नाही.  हेच आरक्षण ओबीसी/जनरल असते तर आतापर्यंत धुरळा उडाला असता..  
प्रचार , मोर्चेबांधणी, फलकबाजी, पार्ट्या, गटबंधन असे सर्व फंडे वापरून इच्छुक उमेदवार व पक्षांनी वातावरण निवडणूकमय करून टाकले असते. 
परंतु आरक्षण निघाल्याने त्यांचा हिरमोड झाला तर ज्यांचे आरक्षण निघाले त्यांचे कडे पैसा नसल्याने ते तिकिटाच्या भरवशावर पक्ष नेत्याकडे चपला झिजवताना दिसत आहेत. 
त्यांना कुणीही सिरियस घेतलेले नाही, नाईलाजाने कुणाला तरी उभे करायचेच म्हणून शेवटच्या क्षणी बोली-बंधन करून सूत्रे हाती राहतील याची काळजी घेऊन उमेदवारी दिली जाईल. तो पर्यंत खेळ मांडला आहे. नंतर हेच खोटा आवेश आणून आम्ही कसे निवडून आणले या बाबत पुरोगामीत्व सिद्ध करतील अशी चर्चा जाणीव सामाजिक क्षेत्रात होत आहे.
एकूणच अनुसूचित जाती जमाती त्या काळी वाळीत टाकलेल्या होत्या त्या आजही दुर्लक्षितच आहेत अशी खंत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका  जाणकाराने व्यक्त केली.
सामाजीक समता अद्याप मनात रुजलेली नाही हे सर्वत्रच असले तरी पु. साने गुरुजी व पुरोगामी वारसा असलेल्या अमळनेर शहरात हा भेद प्रखर पणे समोर आला आहे.  
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments