अमळनेर भाजपाला अंतर्गत नाराजीची वाळवी? विश्वास अविश्वास नाट्याचा अंक रंगणार?

निवडणुक भरात असतानाच बंड उफाळून येणार? 
नगरपरिषद निवडणूकीची धामधूम सुरू असताना जुने व नवे कार्यकर्ते/पदाधिकारी यांच्यात सुसंवाद नसल्याचे दिसून येत असून वर्षोनूवर्षे खस्ता खात ज्यांनी पक्षासाठी रक्त आटवले त्यास जुन्या जेष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने मोठी नाराजी पसरली आहे. 
काल परवा आलेल्या व इकडून तिकडून घुसलेल्या लोकांना मोठा मान व जबाबदारी देताना प्रामाणिक कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर असल्याने मोठी धुसफूस सुरू आहे. 
राज्य व देशात सत्तेत असलेल्या भाजपाला नगराध्यक्ष पदासाठी अद्याप उमेदवार जाहीर करता येत नाही? प्रभागात कुणाला उमेदवारी द्यायची? या बाबत अनुभवी, निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांना कुणी विश्वासात घेत नसल्याने व महत्त्वाचे निर्णय घेताना असाच भेदभाव केला जात असल्याचा आरोप करून ऐन निवडणूकीच्या  धामधूमीत अमळनेर भाजपात मोठे बंड होईल असा दावा देखील करण्यात येत आहे, 
आजच काही लोक आ.अनिल पाटील गटाशी संलग्न झाले आहेत तर काही शिरीषदादा यांच्या संपर्कात आहेत. लवकरच जाहीर रित्या आरोप प्रत्यारोप होऊन मोठा संघर्ष पहावयास मिळाला नाही तर नवल! असेही सूत्रांनी सांगितले. 
शत प्रतिशत भाजप हे धोरण राबवून जिल्हा भाजपमय करणारे उदयबापू आज दुर्दैवाने नाहीत परंतु त्यांच्या पत्नी खासदार स्मिता वाघ यांचे कडे आज तालुक्यातचे पालकत्व आहे. 'त्यांनी ही अंतर्गत धुसफूस  व त्यामागील कारणे शोधून संभावित बंडाळी मोडून काढावी अशी अपेक्षा एका जेष्ठ कार्यकर्त्याने लोकहितवादीशी बोलताना व्यक्त केली. 
कोण आ.अनिल पाटील यांचे संपर्कात, कोण शिरीषदादा यांचे गटात, कोण बंडखोरी करणार  तर कोण तटस्थ असल्याचे सांगून भाजपा पासून अंतर ठेवणार याची खबरबात लवकरच जनते समोर येणार आहे असा दावा देखील त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments