'खा.शी'त स्वच्छ व अभ्यासू माणसाची गरज म्हणून जोशी हवेत!

मतदारांचे डॉ.अविनाश जोशी यांना वाढते समर्थन! 
स्वच्छ चारित्र्य, सतत सामाजिक उपक्रमात सक्रिय, शैक्षणिक व साहित्यिक चळवळीत अग्रेसर असलेले डॉ अविनाश जोशी यांना खाशि मंडळात स्थान हवेच म्हणून मतदारांनी निर्धार केला आहे. 
डॉ अविनाश जोशी यांना मोठे समर्थन मिळत असून आगामी खाशि मंडळ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचे स्थान असेल असे संकेत मिळत आहेत.
डॉ जोशी हे परिवर्तन पॅनल चे उमेदवार असून ख्यातनाम हृदयरोग व फुफ्फुस तज्ञ म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. अमळनेर येथे त्यांचे नेतृत्वाखाली नुकतेच मराठी साहित्य संमेलन भरले होते, तसेच ते मराठी वाङ्मय मंडळाचे सलग चौथ्या वेळेस अध्यक्षपद भूषवित आहेत. 
असा उपक्रमशील व स्वच्छ चारित्र्य असलेला माणूस शिक्षण क्षेत्रात असायला हवा म्हणून जाणकारांचा रेटा आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments