'खाशि'त अजूनही आशिर्वादला उभा राहीला नाही समर्थ पर्याय!

एकतर्फी निवडणूक होणार की अपक्ष यशस्वी आव्हान देणार? 
खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत आशिर्वाद पॅनल विरोधात अद्यापही दुसरे पॅनल निर्माण झाले नाही, त्यांची नावावरून, व्यक्ती वरून पैशावरून खलबते सुरुच आहेत. आशिर्वाद पॅनल मात्र प्रचाराची पाहिली फेरी पूर्ण करण्याकडे वाटचाल करताना दिसत आहे,
अर्थात कुणी कितीही पॅनल-पॅनल खेळले तरी शेवट वजनदार पाकिटांनीच होतो व एकत्र फिरणारे जिसका उसका देखो म्हणत पाकिटांची साईज कमी-जास्त करतात हा अनुभव नवा नाही. 
तसाच प्रकार याही वेळी होणार असला तरी निदान समोरासमोर दोन पॅनल असले की निवडणूकीचे वातावरण जसे तापते ते या वेळी अद्याप तरी तापलेले दिसत नाही. 
अपक्ष उमेदवार धावपळ करून आव्हान उभे करतील इतकी ताकद त्यांच्यातही दिसत नाही. 
एखादया सामाजिक कार्यकर्त्याला साने गुरुजींच्या साक्षीने उभे करून व्हिडीओ व्हायरल केले म्हणजे निवडून येता येईल या भ्रमात असलेल्या लोकांना शिवराम पाटील, प्रा.डॉ  एल ए पाटील यांचे कार्ड लाभेल असे दिसत नाही. 
एक जबाबदार सभासद नैराश्याने म्हटला की, 'इथे प्रतापशेठ व साक्षात सानेगुरुजी उभे राहिले तरी त्यांना मतदार पैसेच मागतील इतकी वाईट सवय लावली आहे!' तेंव्हा इतरांचे काय घेऊन बसलात? 
थोडक्यात खाशित निवडणूक पैशाने होणार व तूर्तास तरी आशिर्वाद हे एकमेव पॅनल आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे.
~~~~~~~~~~~~~
उद्या वाचा.... 
पंकज मुंदडे यांची अपक्ष उमेदवारी आशिर्वादच्या कोणत्या संचालकाला पॅव्हेलीयन दाखवणार? 
~~~~~~~~~~~~
-लोकहितवादी पत्रकार
 धनंजयबापू सोनार 
कार्यकारी संपादक 
दै डेबूजी
79728 81440

Post a Comment

0 Comments