खाशि'त अध्यक्षपद भूषविले तो कधीच संचालक होत नाही

जितेंद्र झाबक अपवाद ठरतील का? 
जितेंद्र झाबक या उत्साही तरुणाला खा शि चे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. आता ते संचालक पदासाठी उमेदवारी करीत आहेत. 
अध्यक्ष झाल्यावर मला संचालक देखील होता येईल असे ज्यांना ज्यांना स्वप्न पडले त्यांना लोकांनी घरीच पाठविले हा आजवरील इतिहास आहे. एकही माजी अध्यक्ष संचालक पदी निवडून येऊ शकलेला नाही. यात अनेक तर पाकिटे देणारे देखील होते तरी त्यांचा दारुण पराभव झाला. 
असे असूनही जितू झाबक यांनी मात्र धाडस केले आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा त्यांनी दिला आहे. धनशक्ती शिवाय 'खा'शि नाही हे पदोपदी सिद्ध झाले आहे. तरीही जितेंद्र झाबक यांनी चालविलेला प्रयत्न यशस्वी ठरेल का? या कडे खा शि तील जाणकारांचे लक्ष लागले आहे. 
तसे झाले तर एक नवीन इतिहास लिहिला जाईल हे नक्की.
~~~~~~~~~~~~~~~~~~
उद्या वाचा-
आपण बिपीन पाटील यांना पाहिलेत का? कधी?
~~~~~~~~~~~~~~~~~~
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
कार्यकारी संपादक 
दै.डेबूजी
79728 81440

Post a Comment

0 Comments