होय, बिपीनबापू पाटील काल दिसले आणि चक्क नम्रतेने सर्वाना भेटले देखील!!

खा शि संचालक पदासाठी पत्नी लीना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना बिपीन पाटील काल दिसले! त्यांनी अत्यन्त नम्रतेने सर्वाना नमस्कार करीत भेटी घेत संवाद साधला.
या पूर्वी केवळ खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत उमेदवारी दाखल करताना व त्या नंतर प्रचाराच्या काळात सक्रिय असलेले बिपीनबापू उर्फ प्रवीण साहेबराव पाटील अन्य वेळी कधीच कुठे दिसत नाहीत अशी ओरड मतदार करीत असतात. 
तशा प्रतिक्रिया  काल अनेकांनी लोकहितवादीला फोन करून दिल्या. 
काल ते पत्नी लीना यांचा अर्ज भरायला प्रतापच्या प्रांगणात  आले तेंव्हाच अनेक वर्षांनंतर दिसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. 
आता 2 तारखे पर्यंत ते पुन्हा उत्साहाने खा शि पंचक्रोशीत चमकू लागतील अशी खोचक टिपणी खा शि च्या एका जेष्ठ मतदाराने केली. 
बापूसाहेब, कुठे होतात इतके दिवस? असा सवालही विचारला जात आहे. या बाबत सविस्तर उद्या. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
कार्यकारी संपादक
दै. डेबूजी 
79728 81440

Post a Comment

0 Comments