आशीर्वाद पॅनल ने सर्वाना गाफील ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधीच आपले आठ उमेदवार निश्चित करून प्रचारास सुरुवात देखील केली होती.
अनेकांना आशिर्वाद मध्येच जायचे होते परंतु तिथे हाऊस फुल चा बोर्ड लागल्याने दुसरे पॅनल उघडावे म्हणून धावाधाव सुरू झाली पण अद्याप भिजत घोंगडे आहे.
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती नारा देत माजी आमदार डॉ. बि.एस. (आबा) पाटील यांचे नेतृत्वाखाली दुसरे पॅनल येणार येणार म्हणून अजूनही चर्चा झडत आहेत. परंतु नक्की काय होतेय? कुठे माशी शिंकली? पैसा हे मूळ कारण आहे का? की माणसे चांगली मिळत नाहीत?
संतोष पाटील सारखा चळवळ्या कार्यकर्ता बदलाची हाक देत आहे, अशा काहींनी एकत्र येऊन दंड थोपटायला हरकत नाही.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै.डेबूजी
79728 81440
0 Comments