आ.दादांचे 'खाशित एकमेव लीनाताई यांना समर्थन म्हणजे इतरांना पाठिंबा नाही,?

अन्य उमेदवारांना दादांचे समर्थन नाही का? की दुसऱ्या पॅनल निर्मितीची ही सुरुवात?
खा शि मंडळ व नगरपरिषदेत  ज्यांनी ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांनी रिव्हर्स गियर टाकला हा इतिहास आहे. 
असे असूनही माजी मंत्री व विद्यमान आमदार यांनी खा शि च्या उमेदवार लीनाताई पाटील यांना सक्रिय पाठिंबा देऊन पत्नी जयश्रीताई त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळतील असे जाहीर केल्याने अनेकांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. 
एकमेव लीना पाटील चांगल्या उमेदवार म्हणजे खा.शि. तील इतर उमेदवार चांगले नाहीत का? असाही चर्चेचा सूर आहे. 
की अनिलदादा उद्या एखाद्या पॅनल ची घोषणा करतील? 
आजवर खाशी व नगरपालिका राजकारणात ज्या सिटिंग आमदारांनी इंटरेस्ट घेतला ते पुन्हा निवडून आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि अनिलदादा यांना हे चांगले माहीत आहे.
तरीही अनिलदादा यांनी हा धाडसी निर्णय घेतला तो यशस्वी ठरेल का? ते इतिहास बदलतील का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. 
तूर्तास तरी दादांच्या या भूमिकेची जोरदार चर्चा रंगत आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments