डॉ.अविनाश जोशीं, संतोष पाटील या आश्वासक नावांची दखल घेतली जाईल का?
खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणूकीत संतोष पाटील सारखा एखादा चळवळ्या कार्यकर्ता या पाकिटांच्या बाजारात बदल करण्यासाठी म्हणून उमेदवारी दाखल करून साद घालतोय, सोबत डॉ. अविनाश जोशी यांचे सारखी निष्कलंक व्यक्ती देखील उमेदवार म्हणून समोर आली आहे. पण त्यांना प्रतिसाद किती लोक देतील? हे येणारा काळ सांगेल.
चांगली माणसे पदावर गेली पाहिजेत हे सर्वच बोलतात पण प्रत्यक्ष मतदान करताना जात, धर्म, गट, कुणी मतदार केले त्याची आठवण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसा पाहिला जातो ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही.
तीन साडेतीन वर्षा नंतर मलाईदार 'भोजनावळी'ची संधी आली असताना ती सोडायचे असे कुणाला वाटेल? हे जेवण, पाकीट व 2 तारखे पर्यंत लोटांगण... नंतर कुणी ढुंकूनही पाहणार नाही हे माहीत असूनही मतदार आपली सवय त्यागत नाही हे चिंताजनक आहेच.
बघूया या वेळी मतदारांच्या मनात काय आहे ते. पर्यायच नाही असे म्हणणाऱ्या लोकांपुढे डॉ. अविनाश जोशी, संतोष पाटील यांचे नाव नक्की पुढे आले आहे. प्रत्यक्षात मतदार न्याय देतील का? हे येणारा काळ सांगेलच!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै. डेबूजी
79728 81440
0 Comments