आशिर्वाद पुढे परिवर्तन सह पंकज मुंदडे, लीना पाटील व जितेंद्र झाबकांचेही आव्हान!

'आशिर्वाद'च्या कुणाला नडणार हे तीन उमेदवार?
खानदेश शिक्षण मंडळ निवडणूकीत सर्वप्रथम पॅनल बनवून प्रचारातही आघाडी घेणाऱ्या आशिर्वाद पॅनल समोर उशिरा पण परिवर्तन पॅनलने आव्हान उभेच केले.. त्यात विद्यमान अध्यक्ष जितेंद्र झाबक व प्रवीण पाटील यांच्या पत्नी लीना पाटील यांच्या रूपाने दोन सदस्यीय तिसरे मीनी पॅनलच जणू समोर आले आहे
जवळपास एकतर्फी होत चाललेल्या या निवडणुकीत आता रंग भरत चालला असून परिवर्तन पॅनल मधील तीन ते 4 कमकुवत उमेदवारांच्या जागी लीना पाटील व जितेंद्र झाबक यांची सरशी होऊन आशीर्वाद च्या सहज विजयाच्या आशा मावळू शकतात असे आज तरी चित्र आहे. तेथील कोणत्या तीन उमेदवारांना अडचण होऊ शकते? परिवर्तन खाते उघडेल का? हा सुध्दा चर्चेचा सूर आहे.
अपक्ष पंकज मुंदडे हे आशीर्वादच्याच एकाचे पंख कापतील हे उघड सत्य देखील नाकारता येणार नाही. 
तूर्तास पंकज मुंदडे, जितेंद्र झाबक व लीना पाटील रेस मध्ये असल्याचे दिसत आहे. 
~~~~~~~~~~~~~~~~
खाशीत निष्क्रिय पदाधिकारी म्हणून शिक्का बसलेल्या बिपीन पाटील यांच्या स्वभावाचा फटका लीना पाटील यांना बसणार? 
सविस्तर उद्या..
~~~~~~~~~~~~~~~~~
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
79728 81440

Post a Comment

0 Comments