​'पत्रकार धनंजय सोनार' चॅनेल सामाजिक बांधिलकी जपणारे माध्यम! – नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर

अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध; नगराध्यक्षांनी मांडले विकासाचे व्हिजन.
"पत्रकार धनंजय सोनार यांचे चॅनेल सामाजिक बांधिलकी जपून विविध ज्वलंत विषयांवर प्रभावी भाष्य करत आहे. समाजाला दिशा देण्याचे काम या माध्यमातून होत आहे," अशा शब्दांत अमळनेरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी चॅनेलच्या कार्याचा गौरव केला.
ज्येष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांच्या निवासस्थानी व 'पत्रकार धनंजय सोनार' चॅनेलच्या स्टुडिओला डॉ. बाविस्कर यांनी आज दि.९ फेब्रुवारी रोजी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी झालेल्या दिलखुलास गप्पांमध्ये त्यांनी अमळनेर शहराच्या विकासाचे 'व्हिजन' उलगडून दाखवले.
●लोकांना माझी कारकीर्द आठवणीत राहील – डॉ. बाविस्कर
​यावेळी बोलताना डॉ. बाविस्कर म्हणाले की, "विकास हेच आमचे मुख्य ध्येय असून कामाला गती देण्याकडे आमचा कल आहे. पाणी, स्वच्छता आणि रस्ते या मूलभूत सुविधा चोख देण्यासोबतच शहराचे सुशोभीकरण करून अमळनेरला एक 'आदर्श शहर' म्हणून नावारूपास आणण्याचा आमचा संकल्प आहे. माझी ही कारकीर्द शहरवासीयांच्या कायम स्मरणात राहील, अशा पद्धतीने आम्ही नियोजित कामे पूर्ण करणार आहोत."
●सांघिक प्रयत्नांतून शहराचा कायापालट
​विकासाचा हा रथ पुढे नेण्यासाठी मा.आमदार शिरिषदादा चौधरी, डॉ. रवींद्रबापू चौधरी आणि सहकारी नगरसेवकांचे मोठे पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे शहराच्या प्रगतीसाठी नवा उत्साह मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
​●स्नेहपूर्ण उपस्थिती
​या सदिच्छा भेटीवेळी पत्रकार धनंजय सोनार यांच्यासह अॅड. सारांश सोनार, युवा वक्ते निर्भय सोनार आणि सौ. शुभांगी सोनार उपस्थित होते. नगराध्यक्षांनी चॅनेलच्या भावी वाटचालीस उत्स्फूर्त शुभेच्छा देऊन या डिजिटल व्यासपीठाचे कौतुक केले.
​-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments