भाजप जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्षपदी सुधीर पाटील!

श्री सुधीर पाटील यांची केळी देखील पोचली परदेशात!!
भडगाव तालुक्यातील बाँबरुड प्र ब येथील प्रगतीशील शेतकरी, आमचे परममित्र सुधीर भिकनराव पाटील यांची जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
जळगाव पश्चिम जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ श्रीनिवास मोरे यांनी त्यांची नियुक्ती केली. सुधीर पाटील भाजपाचे उत्तम संघटक असून कृषी क्षेत्रात असलेल्या त्यांचे संबंधाचा मोठा फायदा भाजपा वाढीसाठी होणार आहे.
निवृत्त विस्तार अधिकारी असलेले सुधीर पाटील हे शेतात रमणारे प्रयोगशील व्यक्ती म्हणूनही ओळखले जातात. 
वैयक्तिक लक्ष देऊन त्यांनी भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र ब येथे फळबाग लागवड केली असून त्यांच्या केळी पिकास पाहण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी शेतकरी बांधव हजेरी लावत असतात.
सुधीर पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादित केलेली केळी इराण, इराक, इझ्राइल, दुबई सह अन्य देशात पोचल्याने भडगावच्या केळी उत्पादकांचा भाव वधारला आहे,
सुधीर पाटील यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments