मितभाषी, व्यापक जनसंपर्क असलेले हाडाचे शिक्षक, पत्रकार ईश्वर महाजन यांना गुणवंत पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवरात्रीच्या पावन निमित्ताने मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जन्म प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६” अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात देवगाव-देवळी येथील माध्यमिक शिक्षक तथा अमळनेर तालुक्यात गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले ईश्वर रामदास महाजन यांना “गुणवंत पत्रकार पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले. समाजहिताच्या जाणीवेने पत्रकारिता करत सर्व क्षेत्रातील बातम्यांना न्याय देत समाजाचे देणे फेडण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक कार्याची दखल घेत मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जनमत प्रतिष्ठानचे पंकजभाऊ नाले व विश्वस्त मंडळाने त्यांना हा सन्मान बहाल केला.
महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते ईश्वर महाजन यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि मानाचा फेटा बांधून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास डायट प्राचार्य निळकंठ गायकवाड, आ. राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्रीताई महाजन, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळे, विजय पवार, सुनील पाटील (शिरपूर), विधीतज्ञ अॅड. निखिल पाटील, मराठी सिनेगायक संघपाल तायडे, अर्चना माळी, भारतीताई काळे, नीताताई सोनवणे, सुनील पाटील, मुकुंद रोटे विजय लुल्हे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जी.एच. रायसोनी कॉलेज, जळगाव येथील डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशनचे एचओडी रफिक शेख यांनी भूषविले.
ईश्वर महाजन यांना गुणवंत पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, ज्येष्ठ पत्रकार धनंजय सोनार,अमळनेर व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकाऱी यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments