सहाव्यांदा टिईटी उत्तीर्ण उपक्रमशील शिक्षक! राजवड विद्यालयाचे ज्ञानेश्वर पाटील यांची करामत!!

सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!!!
गजानन माध्यमिक विद्यालय राजवड (आदर्शगांव) ता. पारोळा जि. जळगांव या शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर प्रकाश पाटील हे 'शिक्षक पात्रता परीक्षा' म्हणजे टिईटी एकदा दोनदा नव्हे तर चक्क सहाव्यांदा पास झाले आहेत.
     देशातील सर्व पहिली ते आठवी वर्गावर शिक्षक म्हणून कार्यरत शिक्षकांना नुकताच दिनांक 1सप्टेंबर 2025 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा दि. 30 ऑगस्ट 2027 पर्यंत पास होण्याचा निकाल देऊन शिक्षकांची नोकरी वाचवण्यासाठी धास्ती वाढवलेली आहे. 
               सदर परीक्षा ज्ञानेश्वर पाटील यांनी 2013,2014,2015,2017,2018 व 2025 या वर्षी सदर परीक्षा दिली व ती उत्तीर्ण सुध्दा केली. महाराष्ट्रात ही परीक्षा केवळ आठ वेळा झाली त्यापैकी ज्ञानेश्वर पाटील  यांनी सहा वेळा परीक्षा दिली व त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले. 
     त्यांच्या या यशाबद्दल छत्रपती कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दादासाहेब कृषीभूषण साहेबराव पाटील, अमळनेर नगरपरिषदेच्या मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसाहेब जिजामाता कृषीभूषण पुष्पलता साहेबराव पाटील व विविध सामाजिक, राजकीय नेते मंडळी, नातेवाईक, मित्र परिवार, राजवड, खेडीढोक-दगडी सबगव्हाण येथील ग्रामस्थ यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.
                            -लोकहितवादी पत्रकार 
                              धनंजयबापू सोनार 
                                7972881440

Post a Comment

0 Comments